मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

श्री कृष्णचरित्र


 

श्री कृष्णचरित्र 


कृष्णकृष्णहीअतिप्राचीनभारतेतिहासातीलइतिहासालाकलाटणीदेणारीएकवास्तविकव्यक्तीहोऊनगेली. विष्णूच्याप्रसिद्ध  दशावतारातीलमत्स्यापासूनवामनापर्यंतचेपाचअवतारजसेकाल्पनिकअवतारआहेत, तसाकृष्णहाकेवळकाल्पनिकअवतारनाही. रामहीअशीचऐतिहासिकव्यक्तीअसणेफार  शक्यआहे, असेपुराणसंशोधकांचेमतआहे. हिंदुधर्मालामानवदेहधारीसाक्षातपरमेश्वरचयादोनऐतिहासिकव्यक्तींच्यारूपातचविशेषतःमिळाला.विष्णू, शिव, देवी, दत्त, गणेशइ. साक्षातपरमेश्वस्वरूपमानलेलेदेवयाऐतिहासिकव्यक्तीहोत्या, असेकोणीहीमानीतनाही.रामापेक्षाहीकृष्णालाहिंदुधर्मातअधिकमहत्त्वआले, तेत्यानेस्थापनकेलेल्या भागवतधर्मामुळेअथवा भक्तिमार्गामुळेहोय. कृष्णाचाचभक्तिमार्गहारामभक्तीतहीपरिणतझाला.

कृष्णचरित्रातअद्भुतअतएबकाल्पनिकअसेप्रसंगवअसेचपराक्रमवर्णिलेलेआहेत. अशाअद्भुतप्रसंगांनीआणिपराक्रमांनीभरलेल्यायाचरित्रातहीवास्तविकऐतिहासिकअंशकिंवाबीजेसहजअनुमानितायेतात. वास्तवालाचकल्पनारम्यअद्भुतरूपदिलेलेलक्षातयेते. बाल्यावस्थेतकृष्णानेपूतनायासाक्षसीचेस्तनपानकरतानाचतिचेप्राणापहरणकेले; याकथेचापूतनानामकबालरोगातूनत्याचीत्वरितसुटकाझालीअसाअर्थलागतो.उखळलादोरानेबांधलेल्याबालकृष्णानेदोनअर्जुनवृक्षांमध्येअडकलेल्याउखळाच्याजोरावरतेदोनअर्जुनवृक्षपाडले, हीकथाहीबांधलेलेउखळत्यानेफरफटतनेलेआणिबागेतीललहानबालवृक्षत्यामुळेमोडूनपडले, यावस्तुस्थितीशीजुळूशकते. गाडाउलथूनटाकणे; प्रचंडउन्मत्तबैलाशीझुंजघेऊनत्याचीशिंगेमोडूनत्यालाठारकरणे; बेलगामवबेफामझालेल्यादांडग्याघोड्यालाकाबूतआणूनवलोळवूनठारकरणेइ. पराक्रमहीनवतरुणवमल्लविद्येतप्रवीणअशाबलिष्ठकृष्णालाशक्यआहेत; असंभवनीयनाहीत. शकटासुर, वृषभासुर, केशीदैत्य, मथुरेच्यादरवाजातीलकुवलयापीडहत्तीइत्यादिकांच्यानिर्दालनाच्याकृष्णाच्यानवयौवनातल्याघटनावास्तविकअसूशकतात. त्यांतअलौकिकबुद्धिमत्ता, शरीरसामर्थ्य, चपलता, प्रसंगावधान, धैर्यआणिकुशलताहेगुणकृष्णाच्याठिकाणीएकत्रितझालेलेदिसूनयेतात. चाणूरासारखेअप्रतिममल्ल, मल्लयुद्धातखेळखेळतठारकरण्याचीहीशक्तीमल्लविद्येतप्रवीणअसलेल्याव्यक्तिलाअसूशकते. कृष्णाच्याबाललीलांमध्येत्याच्यानवयौवनातीसकथांचाअंतर्भावकेलाआणित्याअधिकअद्भुतरसात्मककेल्या; हीगोष्टकृष्णालादिव्यावतारमानण्याच्याकालखंडातझालेलेपरिवर्तनहोय. यशोदेलाबालकृष्णानेआपल्यामुखातविश्वरूपदर्शनदिले, हीकथाअशापरिवर्तनानंतरप्रविष्टझाली. गोवर्धनपर्वतकरंगळीवरकृष्णानेपेलला; अशातऱ्हेच्याहीकथात्याचीदिव्यावतारम्हणूनपूजाझाल्यानंतरकथाहोत. याकथेतहीवास्तवाचेबीजस्पष्टदिसते.इंद्रपूजाकिंवा इंद्रध्वजोत्सवबाजूलासारूनगोप्रचारतसेचभूमीच्याकिंवापर्वताच्यापूजनाचाकृष्णानेपुरस्कारकेला, हीगोष्टकृष्णाच्यानवयौवनातघडणेशक्यआहे. वैदिकश्रेष्ठदेवअसलेल्याइंद्राचेमाहात्म्यकमीकरूनजुन्याधार्मिकपरंपरांना महत्त्वदेऊनत्यासुरूकरण्याचाकृष्णाचायत्नहोता.वैदिकेतरववेदपूर्वहिंदुधर्मातीलपरंपरांनाउजाळादेणाराथोरधर्मसुधारकम्हणूनहीकृष्णाचेमहत्त्वयाकथेनेचांगलेसूचितहोते.वैदिकयज्ञधर्माच्यापरंपरेलादुय्यमलेखणाराआणिवासुदेवभक्तिसंप्रदाय, उपनिषदांच्यातत्त्वज्ञानाचाआधारदेऊन, दृढकरणाराकृष्णहीसर्वश्रेष्ठऐतिहासिकव्यक्तीहोय, असेत्याच्याचरित्रातीलअनेककथांवरूनसूचितहोते. गोपालनआणिगोमातेचीपूजाहाहिंदुधर्मातीलएककेंद्रवर्तीआचारधर्मआहे.याआचारधर्मालाकृष्णानेप्राधान्यदिले.

कृष्णाचादेवकीपुत्रकृष्णअसाउल्लेखछांदोग्यउपनिषदा (..) आलाअसून, मनुष्यजीवनचयज्ञम्हणूनचालवावेयायज्ञाच्यादक्षिणातप, दान, ऋजुता, अहिंसाआणिसत्यवचनह्याहोत; असाउपदोशघोरअंगिरसयाऋषीनेकेल्यामुळेकृष्णहातृष्णामुक्तझाला, असेत्यातम्हटलेआहे. भगवद्गीतेशीहाउपदेशजुळतो.वासुदेवकृष्णाचाअर्जुनाबरोबरउल्लेखपाणिनीनेकेलेलाआहे.क्षत्रियम्हणूनयादोघांनाहीपाणिनिकालीमान्यतानसावी.मूळमहाभारत (. . पू. सु. ३००), हरिवंश (. . पू. सु. दुसरे-तिसरेशतक), विष्णुपुराणाचा (सु. पाचवेशतक) पाचवाअंश, भागवताचा (सु. नववेशतक) दशमस्कंधआणिअखेरीसब्रह्मवैवर्तपुराण (सु. पंधरावेशतक) हेकृष्णचरित्राचेऐतिहासिकक्रमानेमुख्यआधारग्रंथहोत महाभारताच्यासभापर्वामध्येराजसूययज्ञातअग्रपूजेचामानकृष्णालाचकादेणेजरूरआहे, याचेसमर्थनभीष्मानेकेले. त्यासमर्थनाच्यानिमित्तानेजेकृष्णचरित्रभीष्मानेसांगितलेआहे, ते  हरिवंशातूनचजवळजवळसगळेउचललेआहे, असेभांडारकरप्राच्यविद्यासंशोधनमंदिरानेप्रसिद्धकेलेल्याहरिवंशाच्यासंशोधितआवृत्तीच्याप्रस्तावनेतडॉ. . . वैद्ययांनीसिद्धकरूनदाखविलेआहे. म्हणूनअसानिष्कर्षनिघतो, कीकौरव-पांडवांच्यासंदर्भातसांगितलेल्याकृष्णाच्याकथाह्यामहाभारतातीलमूळच्याअसूनसभापर्वातीलभीष्मोक्तकृष्णचरित्रहीहरिवंशातूनघेतलेलीभरआहे. विष्णुपुराणातीलकृष्णकथाहीहरिवंशांच्याचकथेतकाहीभरटाकूनसांगितलेलीआहे.आजभारतातसर्वत्रप्रसृतअसलेलीकृष्णकथाहीमुख्यतः  भागवताच्यादशमस्कंधातीलकृष्णकथाहोय. दशमस्कंधहाकृष्णकथेलावाहिलेलास्कंधआहे.हरिवंशातीलचकथांनाअधिकअद्भुतरम्यरूपदिले.वत्सक, अघासुर, प्रलंबआणिशंखचूडयाअसुरांच्यावधाचेप्रसंग, हीत्यातीलहरिवंशापेक्षानिराळीअशीभरआहे.कुब्जेवरीलप्रेमाच्याकथेतहीअधिकरंगभागवतानेभरलाआहे.‘ब्रह्मस्तुतीआणिवेदस्तुतीही हीअधिकभरघातलेलीप्रकरणे होत.रूक्मिणीस्वयंवरकथेमध्येसुद्धा रूक्मिणीनेकृष्णालापाठविलेलेप्रेमपत्रहरिवंशातनाही, तेयेथेआहे.हरिवंशातीलकेवळकृष्णाचीकिर्तीवरूक्मिणीच्यासौंदर्याचेवर्णनकानावरआल्यामुळे, दोघांचीप्रीतीएकमेकांवरबसली, असेम्हटलेआहे.भागवतातगोपीआणिकृष्णयांच्याशृंगाराचेउत्तानवर्णनआलेआहे.तसेचकृष्णवगोपींची  रासक्रीडा खूपखुलवूनसांगितलीआहे. हरिवंशातहाशृंगारआणिक्रीडासूचकरूपानेचतेवढीआलीआहे.महाभारत, हरिवंश भागवत यांमध्ये कृष्णहागोपींचाप्राणवल्लभम्हणूननिर्दिष्टकेलेलाअसला, तरीतेथेकोठेहीराधेचानिर्देशनाही.हालाच्यागाथासप्तशती (सु. पाचवेशतक)  राधा वकृष्णयांच्याप्रणयाचाउल्लेखआलाआहे. राधाहीइतरगोपींप्रमाणेचपरकीयाआहे, असेएकमतधरूनमध्ययुगीनकाहीकाव्येलिहिलीआहेत, तरराधावकृष्णयांचाविवाहझाला, असेधरूनकाहीकाव्यांमध्येवर्णनआहे.राधाब्रह्मवैवर्तपुराण वजयदेवकविरचितगीतगोविंदातकृष्णाचीपरमप्रियाम्हणूनचमकते. ब्रह्मवैवर्तातविष्णूचीआदिमायाशक्तीहीचराधाबनली.मूळमहाभारतात  जशी कालांतराने भर पडत गेली, तशी मूळ हरिवंशातही ती पडत गेली व मूळ ग्रंथ दुप्पट अथवा तिप्पट झाले. वरील सर्व ग्रंथांमध्ये असलेल्या कृष्ण चरित्रांपैकी भागवतातील कृष्णचरित्र हे मध्ययुगीन देशी भाषांमध्ये प्रामुख्याने प्रसृत झाले. कृष्णाच्या बाललीला आणि राधाकृष्णप्रणय मराठी संतांच्याही कवितांचा विषय बनला.

भाग२ …. श्रीकृष्णचरित्र 

यदुवंशाच्या वृष्णिकुलात कृष्णाचा जन्म झाला. वृष्णी हा यदुवंशातील भीम सात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णी या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले होते. अंधकाकडे मथुरा व तिच्या भोवतालचा परिसर होता. अंधकाचा पुत्र कुकुर. कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. पुत्र झाले. देवकाला चार मुलगे व सात मुली झाल्या. त्यांपैकी देवकी ही कृष्णाची माता होय. उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच पुत्री झाल्या. उग्रसेनाचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कंस होय. कंसाने आपला पिता उग्रसेन यास बंदिखान्यात टाकून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता. वृष्णी, अनमित्र, देवमीढुष, शूर आणि शूराचा वसुदेव अशा पिढ्या सांगितल्या आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण पृथा म्हणजे पहिल्या तीन पांडवांची माता कुंती होय. कुंती ही कुंतभोज राजाला दत्तक गेली होती. देवकाची कन्या देवकी ही वसुदेवाची पत्नी आणि कृष्णाची माता होय. वसुदेवाला देवकी, रोहिणी इ. सात भार्या होत्या.सुदेवाच्या विवाहाच्या अखेरीस वसुदेव व देवकी यांची रथावरून मिरवणूक निघाली. या रथाचे सारथ्य कंसाने आपली चुलत बहीण जी देवकी तिच्यावरील प्रेमामुळे केले. या मिरवणुकीच्या प्रसंगी आकाशवाणी झाली, की कंसा तुझा शत्रू, तुझा वध करणारा, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे’. हरिवंशातील चरित्रात मात्र असे म्हटले आहे, की नारदमुनींनी कंसाचा आतिथ्यसत्कार स्वीकारल्यावर त्याला भविष्य सांगितले, की देवकीचा आठवा गर्भ हा तुझा अंत करणारा होणार आहे. वसुदेव हा उग्रसेनाचा मित्र असलेला मंत्री. त्याच्याबद्दल कंसाच्या मनात अढी होतीच. जरासंधाचा कंस हा जावई. जरासंध हा सर्व भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ सम्राट, राजांचा राजा होता. त्याच्या पाठिंब्यावर कंसाने उग्रसेनाला म्हणजे आपल्या पित्याला पदच्युत करून सिंहासन बळकावले होते. कंस एका मोठ्या सम्राटाच्या पाठिंब्यामुळे अत्यंत उध्दट बनून त्याने प्रजेकडून जबरदस्त करभार वसूल करण्याचा सपाटा लावला. कंस यादवकुलीन होता. यादवांची विशेषतः वृष्णी आणि अंधक कुलांची गणराज्ये होती. स्वतः कंस गणांच्या संमतीने राजा न बनता आपल्या सासऱ्याच्या बळावर राजा बनला. त्यामुळे गणराज्याची पद्धत बिघडविल्या मुळे आणि जुलमी धोरण पतकरल्यामुळे कंसाविरुद्ध असंतोष माजला असावा आणि या असंतोषाचे प्रतिनिधी वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण बनले, असा तर्क करण्यास बरीच जागा आहे. वसुदेव हासुद्धा या असंतोषाच्या मुळाशी असावा. अनेक यादव कुले ही कृषी व गोपालन या व्यवसायांतील होती. पशुपालन व कृषिकर्म हे जोडधंदे, गंगा यमुनेच्या दुआबात भरभराटीस आले होते. भारी कारभारामुळे पशुपालन करणाऱ्या गणांमध्ये असंतोष माजला व नंदगोप हा वसुदेवाचा मित्र, कंसाचा गोपालक असूनही वसुदेवाच्या पक्षाला येऊन मिळाला. मथुरेच्या तीरावर व्रज म्हणजे गोकुळ होते. ही विपुल समृद्धी मिळालेली व्रज्रभूमी होती. नंदगोपाकडे वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी ही सुरक्षिततेकरिता पाठविली होती.काशवाणी वा नारदाची भविष्यवाणी ऐकल्यावर कंस भडकला आणि तो देवकीचा वध करण्यास उद्युक्त झाला. वसुदेवाने त्याची समजूत घातली व स्त्रीवधापासून त्याला परावृत्त केले, असे भागवतात म्हटले आहे. हरिवंशात ही मिरवणुकीतील आकाशवाणी सांगितली नाही. तेथे असे म्हटले आहे, की नारदाची भविष्यवाणी लक्षात ठेवून कंसाने वसुदेवाच्या घरावर गुप्त रक्षक ठेवले; त्यांत स्त्रियाही होत्या. देवकीला संतती झाल्याबरोबर कंसाला संदेश येई आणि त्याप्रमाणे तो नवप्रसूत बालकाचा ताबडतोब वध करून निकाल लावी. अशी सहा बालके त्याने नष्ट केली. सातवा गर्भ उदरात आल्याबरोबर देवकीच्या गर्भाशयातून ओढून घेऊन योगनिद्रादेवीने तो रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. तोच बलराम म्हणून जन्मला. त्याचे जन्मनाव संकर्षण होय. एकीकडून ओढून दुसरीकडे नेलेला म्हणजे संकर्षण होय. आठवा गर्भ म्हणजे साक्षात विष्णूने मानवशरीर धारण केलेला कृष्ण होय. हा प्रसूतिकाली चतुर्भुज विष्णूच्या रूपानेदेवकीपुढेप्रगटझाला; परंतुदेवकीच्याप्रार्थनेनेत्यानेपुन्हा   नवजात बालकाचे रूप धारण केले. हा श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर किंवा अभिजित नक्षत्रावर जन्मला. यावेळी भागवतात सांगितल्याप्रमाणे वसुदेव व देवकी यांच्या पायांत लोखंडी बेड्या कंसाने अडकविल्या होत्या, त्या एकदम निखळून त्यांचे पाय मोकळे झाले. हरिवंशाप्रमाणे बेड्या घातल्याच नव्हत्या. वसुदेवाने मध्यरात्रीच या बालकाला नंदगोपाच्या गोकुळात नेले. नंदगोपाची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती; तिला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने उचललीबालकृष्णाला तिच्या कुशीत झोपविले व तिच्या कन्येला घेऊन परत सूर्योदयाच्या आत तो मथुरेत स्वगृही परतला. भागवतामध्ये हा प्रसंग अधिक अद्भुतरम्य करून वर्णिला आहे. कृष्णजन्माच्या वेळी भर पावसाळा सुरू होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, तिने दुभंगून वसुदेवाला वाट दिली, असे तेथे म्हटले आहे. सकाळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता मिळाली. वसुदेवाने आणलेली यशोदाकन्या त्याच्या हाती लागली. त्याने तिला शिळेवर आपटण्याकरिता उचलले. तोच ती त्याच्या हातातून निसटून तिने आकाशात आपले संपूर्ण शारदादेवीचे रूप प्रगट केले आणि कंसाला सांगितले, की तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे. ही योगनिद्रादेवी यशोदेच्या गर्भात आली, कंसाच्या हातून निसटली, विष्णूच्या वरदानामुळे विंध्यवासिनी देवी बनली आणि सर्व मानवांना पूजनीय, विघ्ननाशिनी व सर्वकाम प्रदायिनी बनली, असे सर्व पुराणांतल्या कृष्णचरित्रांत सांगितले आहे. याचा अभिप्राय असा, की वासुदेव भक्तिसंप्रदायाने किंवा वैष्णव संप्रदायानेदेवीपूजेचा वेदपूर्व धर्म मान्य केला.

नंद आणि यशोदा यांचा पुत्र म्हणून कृष्ण गोकुळात व नंतर गोकुळाची वस्ती उठल्यावर वृंदावनात वाढला. वृंदावनात आल्यावर यमुनेच्या डोहात नागगणांचा अधिपती कालीयनाग गरुडाच्या भीतीने दडून बसला होता. नागांच्या विषाने यमुनेचे पाणी दूषित झाले होते, म्हणून कृष्णाने डोहात उडी घेऊन कालीयनागाचे दमन केले आणि त्याला त्याच्या परिवारा सह लांबदूर वस्ती करण्याच्या अटीवर जिवंत सोडले. कुरुकुल व यदुकुल यांच्याशी नागकुलाचे वैर दीर्घकाळ चालू होते. अर्जुनाकडून करविलेल्या खांडववनदाहात तक्षककुल नष्ट झाले, तक्षक तेवढा वाचला, अशी कथा महाभारतात आहे. परीक्षित राजाचा नाश तक्षकाने केला म्हणून जनमेजयाने सर्पसत्र करून नागकुलाचा नाश केला, अशीही कथा महाभारतात सांगितली आहे. वृंदावनात असताना वार्षिक इंद्रमह, इंद्रयज्ञ, किंवा इंद्रपूजा कृष्णाने बंद पाडून गोवर्धनपूजा सुरू केली. इंद्राने प्रचंड अतिवृष्टी करून, गोपांचे जीवित धोक्यात आणले, तेव्हा कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीने उचलून त्याच्याखाली गायी व गोपालांना रक्षण दिले. इंद्राने अखेरीस प्रसन्न होऊन स्वतःच्या इंद्रपदावर गोविंदाला अभिषेक केला, असे हरिवंशात म्हटले आहे. वैदिक धर्माचे कृष्णभक्तसंप्रदायात रूपांतर झाल्याची सूचक अशी ही कथा आहे.

 

वृंदावनातील कृष्णाचे अनेक शौर्यप्रसंग कंसाच्या कानावर वारंवार पडू लागले. त्यामुळे त्याला नंदगोप व गोपालकुलयांचामत्सरवाटूलागला. गोपालकुलाच्यानिःपातकरण्याचाविचारतोकरूलागला.हीगोष्टनंदाच्यावकृष्णाच्याध्यानातआली.कृष्णानेहीसावधगिरीबाळगूनआलेल्याप्रसंगांनाशिताफीनेतोंडदेण्याचानिश्चयकेला.कंसानेकृष्णाचावबलरामाचायुक्तीनेनाशकरण्याचाउपायशोधला.धनुर्महम्हणजेधनुष्योत्सवयोजला.त्यातउत्कृष्ट, टणक, केवळमोठ्याताकदीनेचवाकवूनपेलतायेणारेधनुष्य, शक्तीचीपरीक्षाकरण्याकरिता ठेवण्याचाविचारकेला. शूरांच्याविविधप्रकारच्यास्पर्धाम्हणजेमल्लांच्याकुस्त्यावधनुष्याचेखेळठेवले.यदुकुलोत्पन्नअक्रूर ह्यालानंदगोपाकडेवृंदावनातकृष्ण-बलरामांनानिमंत्रणदेण्याकरितापाठविले. कृष्ण-बलरामांचासत्कारपूर्वकमथुरेतप्रवेशझाला.मथुरेतराजमार्गावरकृष्ण-बलरामांनापाहण्याकरितानागरिकांच्यारांगालागल्या.राजमार्गातूनजातअसतानावाटेतकंसाचेशस्त्रागारलागले.त्यातहेदोघेवीरविविधशस्त्रांच्यादर्शनार्थउत्सुकतेनेशिरले.तेथेएकमहानधनुष्य, वीरांचीकसोटीकरीलअसे, ठेवलेलेत्यांनीपाहिले.तेकृष्णानेसहजउचलूनवाकविलेवमोडूनफेकूनदिले.मथुरेतवीरांच्यास्पर्धांकरितारंगांगणवप्रेक्षकांचेमंचकसजवूनतयारठेवलेहोते.त्यारंगांगणालाविशालप्रवेशद्वारहोते.कंसानेप्रचंडकुवलयापीडनावाचाहत्तीरंगांगणाच्यादरवाज्याजवळउभाकेलाहोता.सूचनेप्रमाणेकृष्णवबलरामप्रवेशद्वारावरयेताचतोमत्तमातंगकृष्ण-बलरामांवरचालूनगेला.त्याचीसोंडपकडूनत्याचसोंडेच्याशिडीनेत्याहत्तीच्यामस्तकावरकृष्णचढला.त्यानेत्याहत्तीचालांबसुळाउपटूनत्याचशस्त्रानेत्यालारक्तबंबाळकरूनजमिनीवरआडवाकेला.सबंधरंगांगणसागरासारखीगर्जनाकरूनकृष्णाचाजयजयकारकरीतहेलावूलागले.कंसानेआपल्यामल्लश्रेष्ठचाणूरालाकृष्णाचासमाचारघेण्याकरितापुढेकरूनकृष्णालाआव्हानदिले.कृष्णानेएकातडाख्यातचचाणूराचेमर्दनकरूनत्यालायमसदनासपाठविले.त्याच्यापाठोपाठबलरामानेमुष्टिकयामल्लालाचारीमुंडेचीतकेले.अशाअनेकमहामल्लांचीवाटलावल्यानंतर, यादवकुलाचेआणिनंदगोपाच्याजमातीचेनिर्दालनकरण्याचीकंसाचीप्रतिज्ञाआठवून, कृष्णानेकंसाच्यासिंहासनावरझेपघेऊन, कंसाचाशिरच्छेदकेलाआणिकंसाचापिताउग्रसेनयासराज्याभिषेककेला.

 

यादवांच्या ताब्यात मथुरा आली. कंसही यादवच होता; परंतु तो गणांच्या संमतीवाचून राज्य बळकावून बसला होता; म्हणून कृष्णाने मथुरापुरी यादवाधीन केली, असे हरिवंशात म्हटले आहे. त्यानंतर वृंदावनाकडे न जाताच राम व कृष्ण यांनी काशी देशीय परंतु अवंतिपुरनिवासी गुरू सांदीपनीकडे धनुर्वेदाध्ययनार्थ गमन केले. स्वतःची वेदशाखा आणि गोत्र गुरूंना सांगितले; चौसष्ट दिवसांत वेदांचे सांग अध्ययन केले; चतुष्पाद धनुर्वेद व अस्त्रविद्या शिकले. कृतकृत्य झालेल्या कृष्णाने सांदीपनीला गुरुदक्षिणा काय द्यावी म्हणून पृच्छा केली. गुरूने सांगितले,प्रभासक्षेत्रास तीर्थयात्रेकरिता गेलो असताना, समुद्रात महामत्स्याने माझ्या पुत्राला ओढून नेले; त्यास परत आणून दे. कृष्णाने समुद्र प्रवेश केला; समुद्राने त्याला सांगितले की,पंचजन नामक दैत्याने त्या बाळाला गिळले आहे. पंचजन दैत्याचा कृष्णाने वध केला; गिळलेला गुरुपुत्र जिवंत केला; तेथे त्याला उत्कृष्ट शंख मिळाला. त्याचेच नाव पांचजन्य होय. गुरूला मृतपुत्र जिवंत करून अर्पण केला. आपल्या मथुरेतल्या पितृगृही राम व कृष्ण दोघेही परतले. मगधातील राजगृहनामक राजधानीचा अधिपती जरासंध याला आपल्या दोन कन्यांचा पती कंस कृष्णाने मारला ही वार्ता कळल्यावर, कृष्णाचे पारिपत्य करण्याकरिता तो मथुरेवर चाल करून गेला. त्यात मगध सम्राट जरासंध आणि कृष्णाचे वृष्णिकुल यांचे युद्ध झाले. बलरामाने गदायुद्धात जरासंधाला जेरीस आणले; परंतु त्याचा वध न करता शरण आणून सोडून दिले. बलरामाला वृंदावनात पाठविले. राम तेथील आनंदपूर्ण जीवनाचे दर्शन घेऊन मथुरेस परतला. मथुरा राजधानी सुरक्षित रीतीने, निर्भयपणे, शांततापूर्ण जीवन चालवण्यास समर्थ नाही; ही गोष्ट जरासंधाच्या आक्रमणावरून लक्षात आल्यामुळे, कृष्णाने आपल्या यादव वंशातील मथुरावासी वृष्णिकुलाला सल्ला दिला, की ही अशी आक्रमणे सतत वाढत्या प्रमाणात चालू राहणार, म्हणून आपण पश्चिम सागराच्या किनाऱ्यावरून सुरक्षित व शत्रूस दुर्गम असलेल्या प्रदेशाचा आश्रय करूया. कृष्णाने द्वारकापुरीची रचना समुद्र चोहोबाजूस असलेल्या एका बेटावर केली. द्वारकेस वार्ता आली, की जरासंधाचा मित्र कालयवन मथुरेवर चाल करून येत आहे. हे कळल्याबरोबर कृष्ण मथुरेस परतला. कालयवन त्याचा पाठलाग करू लागला. कृष्ण हा झुकांड्या देत त्याच्या हातून निसटला व एका पर्वताच्या गुहेत शिरला. कालयवनाने त्याचा पिच्छा पुरविला. त्या गुहेत मांधात्याचा पुत्र मुचुकुंदराजा देवासुर युद्धात महापराक्रम करून श्रांत होऊन दीर्घ निद्रेला वश होऊन पडला होता. या निद्रेत जो कोणी त्याला जागा करील त्याला क्रोधाग्नीत जाळून टाकील, असा दैवी वाणीने त्याला आशीर्वाद दिला होता. त्याला कालवयनाने कृष्ण समजून लाथ मारून जागे केले. कालयवन त्याच्या नेत्रांतूननिघालेल्याज्वालेतदग्धहोऊननष्टझाला.

कृष्णाने द्वारकेत व भोवतालच्या प्रदेशात बलरामाच्या साहाय्याने गणराज्याची स्थापना केली. या गणराज्याचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात आहे. कृष्णाने विदर्भराजा हिरण्यलोमा किंवा भीष्मक या यादव वंशीय राजाच्या रुक्मिणीनामक सुंदर कन्येशी राक्षस विवाहविधीने विवाह केला. भीष्मकाला दाक्षिणात्येश्वर असे विशेषण हरिवंशात लावलेले आहे. तेथे म्हटले आहे, की कुंडीननामक नगरीत राहून याने अगस्त्याच्या दिशेवर म्हणजे दक्षिण दिशेवर आपली राजसत्ता चालविली. राक्षसविवाहविधी हा क्षत्रियांस विहित मानला आहे. राक्षसविवाहविधी म्हणजे कन्येला तिच्या माता-पित्यांच्या संमतीवाचून पळवून नेऊन विवाह करणे. कृष्णाशी रुक्मिणीचा विवाह होणे, तिचा पराक्रमी बंधू रुक्मी यास मान्य नव्हते. रुक्मीने सैन्य घेऊन कृष्णावर हल्ला केला. जरासंध व तत्पक्षीय सर्व राजे या युद्धात कृष्णाच्या विरुद्ध पक्षास येऊन मिळाले. बलरामाने या युद्धात मोठा पराक्रम करून रुक्मीपक्षास जेरीस आणले. रामासह कृष्ण रुक्मिणीलाद्वारकेसघेऊनगेलावतेथेचशास्त्रोक्तग्रहण विधीने कृष्णाने रुक्मिणीला वरले. असंतुष्ट व क्रुद्ध रुक्मीचा वध अखेरीस बलरामानेच केला. त्यानंतर प्राग्ज्योतिष राज्याचा अधिपती नरकासुर होता, त्याचा कृष्णाने निःपात केला. सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा व लक्ष्मणा यांच्याशी कृष्णाचे विवाह झाले. यांच्यापैकी काहींची निराळी नावेही पुराणांत आढळतात. त्याही पराक्रमाच्या योगानेच त्याने मिळविल्या. कृष्णाच्या या अष्टनायिका होत. नरकासुराचा वध केल्यानंतर पुढे नरकासुराच्या बंदीतील सोळा हजार कन्यांना कृष्णाने बंधमुक्त केले व वरिले. त्यानंतर कृष्णाने आपली विश्वसुंदरी सत्यभामा हिला घेऊन गरुडावर आरोहरण केले आणि देवराज इंद्राच्या नंदनवनात तो गेला. तेथे देवराजेंद्राने त्याचा बहुमान पूर्वक सत्कार केला. नंदनवनातील पारिजातनामक पुण्यगंध दिव्यवृक्ष कृष्णाच्या दृष्टीस पडला. तो उपटून गरुडावर आरोहण करून सत्यभामेकरिता द्वारकेस आणला. त्यानंतर कामदेवासारखा सुंदर असलेला कृष्णपुत्र प्रद्युम्न यास शंबरासुराने किंवा कालशंबराने पळवून नेले. शंबरासुराचा वध करून कृष्णाने प्रद्युम्न परत मिळविला. त्यानंतर बाणासुराशी युद्ध झाले. बाण हा शिवभक्त होता. त्यामुळे शिवाशीही कृष्णाचे युद्ध झाले. बाण व शिव यांचा या युद्धात पराभव झाला. त्यानंतर बाणासुराची कन्या उषा हिच्याशी कृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा विवाह झाला. ही हरिवंशातील कथा शिव भक्तीपेक्षा कृष्णभक्ती अधिक पुण्यप्रद आहे याची सूचक आहे.

भाग४ ….श्रीकृष्णचरित्र 

पांडवांचा आणि कृष्णाचा मैत्रीचा संबंध कृष्णाची भगिनी सुभद्रा व अर्जुन यांच्या विवाहाने दृढ झाला, असे महाभारतात सूचित केले आहे. मगधराज जरासंध आणि कृष्ण यांचे वैर कंसवधापासून सारखे पेटलेलेच होते. कृष्णाने भीमाच्या हस्ते युक्तीने जरासंधाचा वध करविला. धर्मराजाने वनवासापूर्वी राजसूय यज्ञ केला. त्यात अग्रपूजेचा मान कृष्णाला भीष्माच्या सांगण्यावरून मिळाला. चेदी देशाचा राजा शिशुपाल याने या प्रसंगी कृष्णाची राजसभेत भरपूर निंदा केली, त्यामुळे शिशुपालाचा कृष्णाच्या हातून तेथेच वध झाला. पांडवांच्या पत्नीची म्हणजे द्रौपदीची भरसभेत वस्त्रहरण पूर्वक विटंबना झाली, तीत कृष्णाने आपली मानलेली भगिनी हिला वस्त्रे पुरवून तिची लाज राखली. पांडवांच्या वनवाससमाप्तीनंतर कृष्णाने पांडवांचा शांतिदूत म्हणून दुर्योधनास, पांडवांचा राज्यात अर्धा वाटा आहे, म्हणून तो दिला पाहिजे, असे पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्योधनाने पांडव अज्ञातवास गुप्तरीतीने पूर्ण करू शकले नाहीत, या मुद्यावर हट्ट धरून राज्याचा भाग देण्याचे नाकारले. पूर्ण अज्ञातवासाची अट पांडवांना पाळता आली, की नाही हा वादाचा मुद्दा आहे. डॉ. एस्. एल्. कत्रे यांच्या मते ही अट पांडवांना पूर्ण करता आली नाही. भारतीय युद्धात कृष्णाने दुर्योधनाला आपली सेना दिली व स्वतः अर्जुनाचे सारथ्य केले. त्यावेळी अर्जुनाला तत्वज्ञानावर अधिष्ठित असा कर्तव्य पालनास उपयुक्त नीतितत्त्वांचा उपदेश देऊन युद्धाला प्रोत्साहित केले. कृष्णाने या युद्धात पांडवांना अनेक वेळा कुटिल सल्लामसलत देऊन त्यांच्या विजयास भरपूर हात दिला.कृष्णाने युधिष्ठिराला भारतीय युद्धानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर राज्याभिषेक केला व उत्तरेच्या गर्भात असलेला अभिमन्यूचा गर्भ परीक्षित याचे संरक्षण केले. युधिष्ठिराने राज्यरोहणानंतर अश्वमेध केला, त्यात कृष्णाची पुन्हा भेट झाली.कृष्णाच्या अखेरच्या जीवनपर्वात यादवांमध्ये आपसांत मारामाऱ्या होऊन यादवकुलाचा संहार झाला. कृष्णपुत्र सांब याने नारदादी ऋषींची थट्टा केली; त्यामुळे ऋषींनी यादवांना शाप दिला, हे निमित्त झाले. राम कृष्णांना या सर्व गोष्टींचा अत्यंत वीट आला. बलरामाने देहाचे विसर्जन केले आणि कृष्णाने प्रभासक्षेत्राजवळील वनामध्ये योगसमाधी लावली. त्यात एका पारध्याचा बाण लागल्यावर त्याने देह सोडून दिला.दाशरथी रामाने राक्षसांचा निःपात केल्यावर अयोध्येत राज्य करण्यास प्रारंभ केला. तेव्हा द्वापरयुगास प्रारंभ झाला. त्यानंतर पांचाल, पौरव, चेदी, मगध, यादव आणि पूर्वेकडचे आनव या क्षत्रिय वंशांची भरभराट झाली. रामाचा सूर्यवंश रामानंतर अस्ताकडे कलला. पांचालांचा अखेरचा प्रसिद्ध राजा द्रुपद होय. कौरव व पांडव हे पौरव कुलातील होत. चेदी आणि मगध कुलांतील अखेरचे सम्राट शिशुपाल व जरासंध होत. यादवांचे महापुरुष बलराम व कृष्ण होत. आनव वंशाच्या सिंहासनावरील अखेरचा सुप्रसिद्ध शूर राजा कर्ण हा होय. दाशरथी रामाच्या वंशातील अखेरचा पुरुष बृहद्बल; याला कर्णाने पराजित केले. बृहद्बल हा कुरुक्षेत्रावर झालेल्या भारतीय युद्धात अभिमन्यूच्या हातून मारला गेला.

यादवकुलाचा पशुसंगोपन मुख्य व्यवसाय; त्यांच्या काही शाखांमध्ये तो कृष्णापर्यंत चालू होता. त्यामुळे कृष्णकथा ही वैश्य व शूद्र या भारतीय समाजरचनेतील लोकांमध्ये अत्यंत प्रिय झाली. नृत्य व वाद्यकलेत निपुण असलेला हा मुरलीधर गोपगोपींसह रासक्रीडेत रममाण होतो; गोपालनात निपुण; पोहणे, कुस्ती इ. शारीरिक शक्तींच्या खेळांमध्ये तरबेज; उत्कृष्ट मल्ल असा कृष्ण सामर्थ्यशाली सुसंस्कृत जीवनपद्धतीचा आदर्श ठरतो. जरासंध, बाण इत्यादिकांशी संग्रामांत विजयी होणारा वीर म्हणूनही शूरांना तो स्फूर्ती देणारा ठरतो. पांडवांचा मुत्सद्दी सल्लागार आणि भगवद्‍गीतेच्या तत्त्वज्ञानाचा महान द्रष्टा म्हणून कृष्णाचे दिव्य स्थान भारतीय संस्कृतीत अढळ बनले. वेदकालापासून आजपर्यंत झालेल्या जगातील धार्मिक विभूतींमध्ये, धर्मसंस्थापकांमध्ये इतके वैचित्र्यपूर्ण, सर्वांगीण आणि समृद्ध चरित्र जगाच्या वाङ्‍मयात कोणाचेही सापडत नाही. 

पौराणिक परंपरेप्रमाणे कृष्ण हा द्वापर युगाच्या अखेरीस म्हणजे द्वापर आणि कली यांच्या संधिकाळात इ. स. पू. ३००० वर्षांच्या पूर्वी झाला. पुराणांतील ऐतिहासिक कालगणना निश्चित करणाऱ्या पार्गीटर, डॉ. पुसाळकर इ. विद्वानांच्या मते इ. स. पू. सु. चौदावे शतक हा कृष्णाचा काल अनुमानित झालेला आहे. भारतीय युद्ध कित्येक आधुनिकांच्या मते इ. स. पू. १२०० च्या सुमारास झाले. भारतीय युद्धाच्या समयी कृष्णाचे वय १०० किंवा त्याहून थोडे अधिक होते, असे काहींचे म्हणणे आहे.

मूर्तिकलेत व चित्रकलेत कृष्णचरित्रावरील जन्मापासूनचे प्रसंग निर्माण केलेले सापडतात. इ. स. पहिल्या शतकापासून तो पाचव्या शतकाच्या कालातील मूर्तिशिल्पे मथुरेच्या परिसरात सापडली आहेत. वसुदेव कृष्णाला सुपात घेऊन यमुना पार करतो, असे शिल्प पहिल्या शतकातील आहे. पाचव्या-सहाव्या शतकांतील शिलापट्टांवर गोवर्धनधारण, आणि कालियामर्दन अंकित केले आहे. बंगालमधील पहाडपूर येथे धेनुका सुरवध, दोन अर्जुनवृक्ष उलथणे, चाणूर मुष्टिकांशी मल्लयुद्ध, राधाकृष्ण अशा मृत्तिकामूर्ती सापडल्या आहेत. जोधपूरजवळ गोवर्धनधारण,यशोदेचे दधिमंथन,नवनीतचौर्य इ. दृश्ये तोरणस्तंभावर चौथ्या शतकात कोरलेली उपलब्ध झाली आहेत. मध्य प्रदेशातील देवगड येथे कृष्णजन्म, शकट उलथणे, कृष्ण व सुदामा इ. दृश्ये कोरलेली सापडली आहेत. मध्य प्रदेशातील पठारी येथेही कृष्णजन्माचे शिल्प सापडले आहे. यांशिवाय महाबलीपूर, खजुराहो, राजस्थान आणि गुजरात येथेही उत्खननांत विविध कृष्णशिल्पे मिळाली आहेत. सहाव्या-सातव्या शतकांतील विष्णुधर्मोत्तर पुराणात पूजेसाठी निर्माण करावयाच्या कृष्णमूर्तीचे रुक्मिणी व सत्यभामा यांच्यासह शिल्प कसे तयार करावे, याचे तंत्र सांगितले आहे. रांगता बालकृष्ण उडुपीला; मुरलीधर, राधासहित कृष्ण किंवा सत्यभामा सहित कृष्ण किंवा पार्थसारथी कृष्ण इ. कृष्णमूर्ती हंपी, कांची, महाबलीपूर इ. ठिकाणी दक्षिणेत आढळतात. भारतीय चित्रकलेतही कृष्णलीला चित्रित केलेल्या आहेत. गुजराती, राजपूत, कांग्रा, ओरिसा, काशी इ. शैलींमध्ये कृष्णलीला चित्रित केलेल्या आहेत. नंदलाल बोस, जेमिनी रॉय इ. आधुनिक चित्रकारांनीही कृष्णचित्रे रंगविलेली आहेत.