भारतीय संस्कृती हा शब्द समुच्चय आपण सर्वजण अनेकदा ऐकतो ....
" हे भारतीय संस्कृतीस शोभत नाही " ,"हे भारतींय संस्कृतीस हानिकारक आहे " वगैरे वगैरे वाक्ये लेखात व भाषणात आपणास वाचावयास ,ऐकावयास मिळतात ...अश्या वेळेस "भारतीय संस्कृती" ह्या शब्दाचा अर्थ काय असतो ?
तिथे भारतीय संस्कृतीचा इतिहास अभिप्रेत नसतो ; भारतीय संस्कृतीची जी एक विशेष दृष्टी आहे ती येथे अभिप्रेत असते .हि दृष्टी कोणती ?
चला तर मग आपण ती दृष्टी कोणती ते पाहण्याचा प्रयत्न करूयात ........
भारतीय संस्कृती हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आहे .उदार भावना व निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनास सुंदरता आणणारी हि संस्कृती आहे .ज्ञान विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी हि संस्कृती आहे .भारतीय संस्कृती म्हणजे कर्म-ज्ञान -भक्तीचा जिवंत महिमा - शरीर ,बुद्धी,व हृदय यांना सतत सेवेत झीजवण्याचा महिमा म्हणजे भारतीय संस्कृती.
भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती ,भारतीय संस्कृती म्हणजे विशालता ,भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग.भारतीय संस्कृती म्हणजे स्थायू न राहता सारखे ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे.जगात जे जे काही सुंदर दिसेल ते ते घेऊन वाढणारी हि संस्कृती आहे . जगातील सारे ऋषी ,महर्षी ह्यांची पूजा हि संस्कृती करेल .जगातील सर्व संतांना हि संस्कृती वंदन करील .जगातील सर्व धर्मासंस्थापकांना हि संकृती आदराने पाहिलं व आनंदाने त्यांचा संग्रह करील .
भारतीय संस्कृती संग्राहक आहे .ती सर्वांना जवळ घेणारी आहे .
"सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारभे / " असे म्हणणारी हि भारतीय संस्कृती आहे .संकुचितपणाचे वावडे असणारी हि भारतीय संस्कृती आहे .आणि म्हणूनच भारतीय संस्कृती म्हणताच माझे दोन्ही हात आपोआप जोडले जातात .
भारतीय संस्कृती म्हणताच सागर व अंबर या दोन महान वस्तू माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात ...प्रकाश व कमाल या दोन दिव्या वस्तू डोळ्यासमोर उभ्या राहतात.त्याग , संयम, वैराग्य,सेवा , प्रेम, ज्ञान, विवेक,ह्या गोष्टी आठवतात .
भारतीय संस्कृती म्हणजे सान्तातून अनन्ताकडे जाणे ,अंधारातून प्रकाशाकडे जाणे ,विरोधातून विकासाकडे जाणे ,विकारातून विवेकाकडे जाणे,गोंधळातून व्यवस्थेकडे जाणे ,आरडाओरडीतून संगीताकडे जाणे ,चिखलातून कमळाकडे जाणे, भेदातून अभेदाकडे जाणे.
भारतीय संस्कृती म्हणजे मेळ ,सर्व धर्मांचा मेळ ,सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञान विज्ञानाचा मेळ , सर्व काळांचा मेळ , सर्व कला ह्यांचा मेळ. अश्या प्रकारचा महान मेळ करू पाहणारी ,सर्व मानव जातींचा मेळा मांगल्या कडे घेऊन जाऊ पाहणारी .अशी जी थोर संस्कृती आहे ती हि आपली "भारतीय संस्कृती"
तिच्याच ठाई जन्मोजन्मी मला जन्म भेटू दे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे ....
"जननी जन्माभूमिस्च्य स्वर्गादपि गरीयसी" अर्थात जननी ,जन्मभूमी ह्यांचा मला अभिमान आहे त्या मला स्वर्गापेक्षा प्रिय आहेत...त्या माझ्यासाठी स्वर्गच आहेत ....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा